HW News Marathi
मुंबई

‘नो पार्किंग’ प्रकरणानंतर महापौरांना मुंबई ट्रॅफीक पोलिसांकडून ई-चलन

मुंबई | महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी वाहतुकीचे नियम मोडल्याची घडना नुकतीच घडली आहे. महाडेश्वर यांची गाडी ‘नो पार्किंग’ बोर्डच्या अगदी समोर उभी असल्याचे दिसून आले आहे. हा संपूर्ण प्रकार शनिवारी (१३ जुलै) महापौर विलेपार्ल्यातील मालवणी आस्वाद या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची गाडी ही नो पार्किंगमध्ये उभी होती. या संपूर्ण प्रकरणानंतर सर्व स्तरातून महाडेश्वर यांच्यावर टीका झाली. त्यामुळे सर्वसामान्यांना लागू असणारे नियम राजकीय मंडळींसाठी लागू होत नाहीत का, असा सवाल उपस्थित होत आहे. परंतु, महापौरांवर मुंबई ट्रॅफीक पोलीस प्रशासनाकडून ई-चलन पाठवून कारवाई करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्तांनी मुंबईत सध्या नवी पार्किंग पॉलिसी जारी केली आहे. यानुसार वाहनतळाच्या ५०० मीटरपर्यंतच्या क्षेत्रात अनधिकृत पार्किंग आढळल्यास ५ ते १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद आहे. या नव्या पार्किंग पॉलिसीनुसार महापौरांच्या गाडीलाही १० हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. नो पार्किंग झोनमध्ये गाडी पार्क केली नव्हती, तर उतरण्यासाठी गाडी तिथे थांबवली होती, त्यामुळे नियमांचे उल्लंघन झाल्याचे म्हणता येणार नाही, अशी सारवासारव महाडेश्वर यांनी दिली आहे. तसेच पावती आल्यास दंडाची रक्कम भरु, असेही महापौरांनी सांगितले.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाणे सर्वाधिक वर्दळीचे रेल्वे स्थानक

News Desk

बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या घरांबरोबरच परवडणाऱ्या घरांची निर्मितीही करावी! – मुख्यमंत्री

Aprna

प्रदीप शर्मा पुन्हा पोलीस सेवेत

News Desk