HW News Marathi
महाराष्ट्र

सरकार तुमच्यासाठी काम करतंय, तुम्ही सरकारला सहकार्य करा !

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार जनतेशी संवाद साधत आहेत. आज (२९ मार्च) पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी लोकांशी संवाद साधला. सुरुवातीलाच त्यांनी लॉकडाऊनसाठी लोकं देत असलेला प्रतिसाद हा चांगला आहे असेच सहकार्य करत राहा असे आवाहन केले. त्यानंतर कोरोनाच्या या संकटसमयी विरोधी पक्ष नेते, राज ठाकरे वारंवार मला फोन करुन चौकशी करतात असे त्यांनी सांगितले.

कोरोनापासून कसे वाचता येईल यासाठी अनेक जण स्वतहून मदत करत आहेत. कोटक यांनीही १० कोटींची मदत केली तर काही जम हॉस्पिटलचे साहित्य पुरवत आहे तर कोणी गरजूंना जेवण देत आहे. दरम्यान, कोरोना विषाणूचा हा काळ गुणाकाराचा आहे मात्र आपम सगळ्यांनी एकत्र येऊन त्याची वजाबाकी करणे गरजेचे आहे. नागरिकांची कोणतीही गैकसोय होऊ नये यासाठी पोलिस बांधवही जीवाची बाजी लावून दिवसरात्र काम करत आहेत. त्यांच्या या कामात त्यांना सहकार्य करा आणि घरातच राहा. तसेच, जीवनावश्यक गोष्टींचा आपल्याकडे तुटवडा नाही आहे. २४ तास ही सेवा सुरु ठेवण्यात आली आहे. पण तरीही विनाकारण लोकं घराबाहेर पडत आहेत. तसे त्यांनी करु नये, आणि जर का गर्दी कमी नाही झाली तर सरकारला आणखी कठोर पावले उचलावी लागतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, कस्तुरबा रुग्णालयातील डॉ. पवार आणि पुण्यातील नायडू रुग्णालयातील डॉ. पाटसूटे यांच्याशी रोज बोलणे होते. अनेक लोकांनी मला सांगतिले की डॉक्टरांशी बोला त्यांचे मनोबल वाढेल, पण मी सांगतो की मी त्यांच्याशी बोलल्यानंचर माझे मनोबल वाढते, अशा शब्दांत त्यांनी डॉक्टर अहोरात्र करत असलेली मेहनत आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनीही मानाचा मुजरा केला. दरम्यान, परदेशातून अनेक भारतीयांना देशात आणण्यात आले आहे. त्यामूळे कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, परंतू ती संख्या अपेक्षितच हवी अशी चिंताही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. कोरोनाच्या या विळख्यातून सुटण्यासाठी सरकार तुम्हाला मदत करत आहे तुम्हीही सरकारची मदत करा असे आवाहनही त्यांनी यावेळी जनतेला केले. आपण या लढाईत जिंकू हा विश्वास मला आहे आणि तो तुम्हालाही असूद्या असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिला. घरातच राहा, कुटुंबोसोबत वेळ घालवा, आपले छंद जपा असेही त्यांनी सांगितले. लॉकडाऊनचे ८ दिवस तर निघून गेले पुढचेही जातील, असा विश्वासही त्यांनी दिला. कोरोनाच्या या संकटकाळात केंद्र सरकार तथा विरोधी पक्ष नेतेही सरकारच्या सोबत आहे. त्यामुळे एकत्रित येऊन या लढाईत यशस्वी होऊयात, असे आवाहन मुख्यंमंत्र्यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओमायक्रॉनवर मात करण्यासाठी लसीकरणाला अधिकाधिक गती द्यावी! – अजित पवार

News Desk

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी

News Desk

इंदुरीकर महाराजांच्या अडचनीत वाढ, औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल

News Desk