HW News Marathi
महाराष्ट्र

महापौरांची गाडी ‘नो पार्किंग’ झोनमध्ये, दंडात्मक कारवाई ?

मुंबई | महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी वाहतुकीचे नियम मोडल्याची घडना घडली आहे. महाडेश्वर यांची गाडी ‘नो पार्किंग’ बोर्डच्या अगदी समोर उभी असल्याचे दिसून आले आहे. हा संपूर्ण प्रकार शनिवारी (१३ जुलै) महापौर विलेपार्ल्यातील मालवणी आस्वाद या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची गाडी ही नो पार्किंगमध्ये उभी होती. परंतु महापौरांवर अद्याप कोणतीही दंडात्मक कारवाई झालेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना लागू असणारे नियम राजकीय मंडळींसाठी लागू होत नाहीत का, असा सवाल उपस्थित होत आहे.

महापालिका आयुक्तांनी मुंबईत सध्या नवी पार्किंग पॉलिसी जारी केली आहे. यानुसार वाहनतळाच्या ५०० मीटरपर्यंतच्या क्षेत्रात अनधिकृत पार्किंग आढळल्यास ५ ते १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद आहे. या नव्या पार्किंग पॉलिसीनुसार महापौरांच्या गाडीलाही १० हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. नो पार्किंग झोनमध्ये गाडी पार्क केली नव्हती, तर उतरण्यासाठी गाडी तिथे थांबवली होती, त्यामुळे नियमांचे उल्लंघन झाल्याचे म्हणता येणार नाही, अशी सारवासारव महाडेश्वर यांनी दिली आहे. तसेच पावती आल्यास दंडाची रक्कम भरु, असेही महापौरांनी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महानगरपालिका निवडणुकांसाठी मनसे कंबर कसून तयार!

News Desk

महेश कोठेंची शिवसेनेतून हकालपट्टी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार कारवाई

News Desk

‘ड्रायव्हिंग करत कोकणात जाणार आहात का?’ चित्रा वाघांचा मुख्यमंत्र्याना कटू सवाल

News Desk