HW News Marathi
महाराष्ट्र

‘ड्रायव्हिंग करत कोकणात जाणार आहात का?’ चित्रा वाघांचा मुख्यमंत्र्याना कटू सवाल

मुंबई | काँग्रेसच्या प्रदेशउपाध्यक्ष चित्र वाघ या नेहमीच विरोधी पक्षावर टीका करत असतात. कोकणात पूर परिस्थिती निर्माण झाली असून अनेक नेते तिथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. मु्ख्यमंत्रीसाहेब, आता तुमच्या ड्रायव्हिंग कौशल्याची खरी गरज आहे… ड्रायव्हिंग करत आपण कोकणात जाणार आहात का?, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

कौशल्याची खरी गरज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूरला स्वतः गाडी चालवत गेले, या वरून विरोधकांनी अनेक टीका केल्या होत्या. आता संपूर्ण कोकण पुराच्या पाण्यात असताना आणि खऱ्या अर्थाने लोकांना शासनाच्या मदतीची गरज असताना मुख्यमंत्री गाडी चालवून कोकणच्या दिशेने जाणार का?, असा खडा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. राज्याचे कुटुंबप्रमुख हे स्वत:ची जबाबदारी समजत स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का? मुख्यमंत्री महोदय आता खरी गरज आहे तुमच्या ड्रायव्हिंग कौशल्याची, असं ट्विट करुन चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना परिस्थितीची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न केला आहे.

 

चिपळूणमध्ये पूर परिस्थिती

चिपळूण शहरात काल (२२ जुलै) अतिवृष्टीमुळे झालेल्या पुराच्या पाण्याची पातळी ही जवळपास चार ते पाच फुटांनी खाली आली आहे. रात्रभर पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी पातळी वेगाने कमी होत आहे. त्यामुळे चिपळूणवासियांनी काहीसा सुटकेचा निश्वास सोडला आहे. चिपळूणमध्ये सकाळच्या वेळात रिमझिम पाऊस सुरु आहे.

चिपळूण शहरात २०२ मिमी पडलेला पाऊस, धरणातून सोडण्यात आलेले पाणी, भरतीची स्थिती अशा कारणांमुळे चिपळूणमध्ये २००५ पेक्षा भयानक स्थिती निर्माण झाली. चिपळूण परिसरात सध्या कुठेही विद्युत पुरवठा सुरु नसून पूरग्रस्तांची संपूर्ण रात्र अंधारात गेली. त्यातच मोबाईललाही नेटवर्क नसल्यामुळे संपर्क साधण्यास अनेक अडचणी येत आहेत.

महाडमध्ये दरड कोसळली

कोकणात सतत ३ दिवस जोरदार पाऊस पडत आहे. महाड मध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. महाडमधील तळई गावातील तब्बल ३० हून अधिक घरांवर दरड कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या दुर्घटनेत येथील तब्बल ७० ते ७५ नागरिक बेपत्ता असल्याची माहिती मिळते. दरम्यान, काही वर्षांपूर्वीच अशीच घटना पुणे जिल्ह्यातील माळीण गावात घडली होती. ज्यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्रामुळे भूजल व्यवस्थापनाच्या कामाला नवी ओळख’ – अजित पवार

News Desk

महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी आम्ही केंद्राच्या पाया पडायलाही तयार!

News Desk

मुंडे साहेबांच्या जयंतीदिनी रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित करा, पंकजा मुंडेंचे आवाहन

News Desk