श्रीहरिकोटा । संपूर्ण जगाचे लक्ष्य भारताची अतंराळ संशोधन संस्था इस्रोची महत्वाकांक्षी ‘चांद्रयान-२’ ही मोहीमकडे लागले होते. परंतु तांत्रिक अडचणींमुळे तात्पुरते प्रक्षेपण रद्द करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे लॉन्चिंगच्या काही तास आधी चांद्रयान-२ मोहीम स्थगित करण्यात आले आहे. तांत्रिक कारणामुळे हा निर्णय घेतला असल्याचे इस्रोने जाहीर केले आहे. आता चांद्रयान-२ चंद्राकडे कधी झेपावणार याची नवीन तारीख लवकरच इस्रोकडून जाहीर करण्यात येईल.
A technical snag was observed in launch vehicle system at 1 hour before the launch. As a measure of abundant precaution, #Chandrayaan2 launch has been called off for today. Revised launch date will be announced later.
— ISRO (@isro) July 14, 2019
लॉन्चिंगच्या जवळपास एक तास आधी व्हेहिकल सिस्टिममध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. सावधगिरीचा उपाय म्हणून आम्ही चांद्रयान-२ चे लॉन्चिंग थांबवण्याचा निर्णय घेतला. १५ जुलैच्या मध्यरात्री २ वाजून ५१ मिनिटांनी चांद्रयान चंद्राकडे झेपावणार होते. परंतु लाँचिंग काऊंटडाऊनच्या जवळपास ५६ मिनिट आधीच मोहीत स्थगित करण्यात आली.
विशेष म्हणजे दोन महिला शास्त्रज्ञांकडे या मोहिमेची धुरा देऊन ‘इस्रो’ने नवा इतिहास रचला आहे. चांद्रयान-२ ही मोहीम राबवण्यात यश मिळाल्यास अमेरिका, रशिया, आणि चीननंतर प्रगत तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा चौथा देश म्हणून नाव जगभरात ओळखले जाणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.