HW News Marathi
देश / विदेश

भारतीय वायू दलाचा १ पायलट परतलेला नाही | परराष्ट्र मंत्रालय

नवी दिल्ली | भारताच्या हवाई हद्दीमध्ये पाकिस्तानी लढाऊ विमान शिरल्याची महत्त्वाची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली होती. नौशेरा सेक्ट्रमधील राजौरी येथे पाकिस्तानी विमानाने घुसखोरी केली आहे. पाकिस्तानकडून हवाई हद्दीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत शिरून पुंछ, राजौरी भागात बॉम्ब टाकल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले होते. काहीच वेळापूर्वी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी वायू दलाच्या घुसखोरी केल्याची अधिकृत माहिती दिली आहे. “भारतीय वायू दलाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले मात्र वायू दलाचे एक विमान अद्याप परतले नसून भारतीय दलाचा एक पायलट देखील परतलेला नाही”, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी यावेळी दिली आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :

  • सकाळी पाकिस्तानच्या वायू दलाच्या विमानाने भारतात घूसखोरी केली
  • भारतीय वायू दल सतर्क होते
  • भारतीय वायू दलाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले
  • पाकिस्तानचे एफ-१६ हे विमान भारताने पाडले
  • भारतीय वायू दलाचे मिग-२१ हे विमान परतलेले नाही
  • भारताचा १ पायलट परतलेला नाही
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पर्रिकर चौथ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री

News Desk

तिथे मॅप बदलले जात आहेत, आणि आपण इथे ॲप वर बंदी घालतोय

News Desk

राहुल गांधींनी हे बोलून न्यायालयाचा अवमान केला !

News Desk