मुंबई | देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घतला आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ७०० पार गेली तर राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा १३५ वर पोहोचला आहे. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. यादरम्यान नागरिकांनी घरा बाहेर पडू नका, घरात राहा, असे आवाहन केंद्र आणि राज्य सरकारने केले आहे. यामुळे हातावर पोट भरणारे मंजूर, गोरगरिब आणि कामगार समजातील याघटना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पाश्वभूमीवर रोटी फाउंडेशन आणि मुंबई पोलीस यांच्या संयुक्त विद्यामानाने मंजूर, गोरगरीब आणि कामगारांना अन्नाचे वाटप करून मदतीचा हात पुढे केला आहे. जेणे करून या मंजूर, कामगार आणि गोरगरीब यांचा उपास मार होऊ नये, यासाठी रोटी फाउंडेशन आणि पोलिसांनी हे पाऊल उचले आहे.
रोटी फाउंडेशन आणि मुंबई पोलीस हे मुंबईतील हँडॉप हिल आणि माटुंगा परिसरातील मंजूर, गोरगरीब आणि कामगारांना दररोज ४०० जेवणा पाकिटे वाटून त्यांची मदत करत आहे. या देशावर कोरोनाचे संकट ओडवले असूसन या संकट काळात गोरगरिबांना मदत करून खारीचा वाटा उचलत आहेत. देशाचे आहोरात्र सरक्षण करणाऱ्या पोलिसांनी रोटी फाउंडेशसोबत या गोरगरिबांना मदत करत माणुसकीचा नवा पायंडा रचला आहे. जेवणाचे वाटप करता पोलिसांनी तोडावर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग या नियमाचे देखील पालन केल्याचे दिसून येत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.