HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक! मुंबईतील ३०५ इमारती BMCनं केल्या सील

मुंबई | देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. पुन्हा एकदा रोज २० हजारांच्या वर नवे कोरोना रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्याने चिंताजनक परिस्थिती झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यातही देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली आहे. ६ दिवसांत १३ हजार रुग्ण आढळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट झाल्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. बृहन्मुंबई महापालिकेकडून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात असतानाही मुंबईतील पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण वाढलं असून, शनिवारी ३ हजार ६२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिकेनं मुंबईतील ३०५ इमारती सील केल्या आहेत.

राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मुंबईत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून आले आहेत. चिंतेची बाब म्हणजे मागील ६ दिवसांत राज्यात आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी १३ हजार ९१२ रुग्ण मुंबईतील आहेत. त्यामुळे बृहन्मुंबई महापालिकेची चिंता वाढली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेनं चाचण्यांचं प्रमाण वाढवलं आहे. मुंबईत ७ ऑक्टोबर २०२० रोजी म्हणजे मागच्या वर्षी उच्चांकी रुग्णसंख्येची नोंद झाली होती. एका दिवसातील ती रुग्णसंख्या होती २ हजार ८४८ इतकी. त्यानंतर पहिल्यांदाच हा आकडा ३ हजारांच्या पुढे गेला आहे.

वाढता प्रसार रोखण्यासाठी महापालिकेकडून कंटेनमेंट झोन तयार केले जात आहे. त्याचबरोबर मॉल्स, सिनेमागृहांसह गर्दी होणाऱ्या सार्वजनिक ठिकाणीही चाचण्या करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. तर दुसरीकडे रुग्ण आढळून येणाऱ्या इमारती सील केल्या जात आहे. मागील सहा दिवसांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. १३ मार्च रोजी मुंबईत ३१ कंटेनमेंट झोन होते. तर २२० इमारती सील करण्यात आल्या होत्या. १८ मार्चला त्यात मोठी वाढ झाली. कंटेनमेंट झोन ३४ झाले असून, ३०५ इमारती सील करण्यात आलेल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना आमदारांच्या कोरोना रिपोर्टमध्ये झोल झाला आहे का? – निलेश राणे

News Desk

दोन्ही व्हॅक्सीन सुरक्षित;आरोग्य कर्मचार्‍यांनी व्हॅक्सीनेशन कार्यक्रमात सहभागी व्हावे – राजेश टोपे

News Desk

राज्यात २०,४८२ नवे रुग्ण आढळले, तर १९,४२३ कोरोनामुक्त

News Desk