HW News Marathi
Covid-19

केंद्र-राज्य सरकारला ‘कोरोना’शी लढण्यासाठी सचिन तेंडुलकरकडून आर्थिक मदत

मुंबई | देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी मास्टल ब्लॉस्टर सचिन तेंडुलकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारला ५० लाखांपैकी २५ लाख हे राज्य सरकारच्या मुख्यमंत्री मदत निधीत, तर २५ लाख हे पंतप्रधान मदत निधीत दिले जाणार आहेत. तेंडुलकरच्या जवळच्या व्यक्तीनं सांगितलं मात्र, याबद्दल सचिन तेंडुलकर कोणाला सांगयची नव्हती. पण, सिचनच्या जवळच्या व्यक्तींने त्यांनी केल्याची माहिती दिल्याचे मुंबई मिरर या इंग्रजी वृत्तपत्रमध्ये प्रसिद्ध केले आहे.

यापूर्वीही सचिनने ऑस्ट्रेलियात जंगलाला लागलेल्या आगीत मोडलेला संसार उभा करण्यासाठी लोकांना २५ हजार ऑस्ट्रेलियन डॉलरची म्हणजे ११.४ लाखची मदत केली होती. सचिनने नेहमीच सामाजकार्यात पुढाकार घेऊन आर्थिक मदत केली आहे. याआधी महेंद्रसिंग धोनी, टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली, इरफान व युसूफ पठाण यांनीही कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी सरकारला मदत केली आहे. गांगुलीने गरजूंना ५० लाख किंमतीचे तांदुळ दिले आहेत. तर पठाण बंधुंनी मास्क वाटप केले आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवन यानेही पंतप्रधान मदत निधीत आपले योगदान केले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशननेही राज्य सरकारला ५० लाखांचा निधी दिला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईचे नवीन महापालिका आयुक्त चहल आज हाॅटस्पाॅट धारावी व नायर रुग्णालयाला देणार भेट

News Desk

औरंगाबाद जिल्ह्यात १, ११७ कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

मुंबईतील निर्बंध अजूनही कायमच, मुंबई महापालिकेने घेतला निर्णय

News Desk