HW News Marathi
मुंबई

अनोख्या पद्धतीने वैलेंटाइन डे साजरा

मुंबई | वैलेंटाइन डे म्हटले की आजची तरुण मंडळी आपल्या प्रेयसी सोबत तर कोण आपल्या प्रियकरा सोबत हा दिवस साजरा करत असतात. पण ज्या आई-बाबांनी आपल्याला लहानाचे मोठे केले प्रेम दिले त्या आई बाबांना मात्र आज काहींनी वृद्धश्रमात सोडून दिले आहे.

अशा वृद्धांच्या आणि अपंगाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी बुधवारी वैलेंटाइन डे निमित्ताने महालक्ष्मी येथील किंग जॉर्ज व्ही मेमोरियल वृद्धश्रमात अपंग वृद्धांसोबत वेदीक्युअर वेलनेस चॅरिटेबल ट्रस्ट ने वैलेंटाइन डे साजरा केला. यावेळी त्यांना संयुक्त उपचार पद्धतीचे मार्गदर्शन केले. तसेच मोफत तपासणी शिबीर आणि गुलाब देऊन त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला. यावेळी वेदीक्युअर चे जीएम डॉ. राकेश सिंह आणि त्यांच इतर सहकारी डॉक्टर उपस्थित होते.

डॉ. अनिल पाटील यांची ही सामाजिक संस्था आहे. यावेळी संयुक्त उपचार पद्धतीद्वारे येथील वृद्ध रुग्णांना आरोग्य बद्दल मार्गदर्शन केले. तसेच त्यांची तपासणी करण्यात आली. येथील एकूण 58 वृद्धांसाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. आजच्या प्रेमाचा दिवस आहे त्याच्या पर्शवभूमीवर तरुणांना देखील यातून एक संदेश देण्यात आला आपल्या आई वडीलांवर प्रेम करावे आई विना स्वामी तिन्ही जगाचा भिकारी असा संदेश ही देण्यात आला.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डबेवाल्यांची जागा बळकावली कुणी ?

News Desk

पोलीस वसाहतीत स्लॅब कोसळून एक महिला जखमी

News Desk

डबेवाल्यांच्या माध्यमातून प्रदुषण मुक्तीचा संदेश

swarit