HW News Marathi
मुंबई

चेंबूर येथे पेट्रोल पंपचा स्लॅब कोसळून दोन जण गंभीर जखमी

मुंबई | चेंबुर पूर्व येथील छगन मीठा पेट्रोल पंपाचा स्लॅब कोसळल्यामुळे गुरुवारी दुपारी दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. लालचंद ढोलपुरिया (२६) आणि जतीन मंडलीक (२५) अशी या जखमींची नावे आहेत. यातील एक जण पेट्रोल पंपावरील कर्मचारी असून दुसरा पेट्रोल भरण्यासाठी आलेला दुचाकीस्वार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

गुरुवारी दुपारी १२.३६ च्या सुमारास या पेट्रोल पंपाचा स्लॅब कोसळल्यामुळे एकच खळबळ उडाली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस दाखल झाले असून दोन जखमींना सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईच्या तापमानात वाढ

News Desk

इंडिगो विमानात बॉम्ब असल्याची अफवा

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल २० मिनिटे उशिराने

News Desk