गोरेगावतील एका तरूणाला पोलिस अधिका-यांनी पैशाची मागणी करत जबर मारहान केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. ही घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी मारहान केलेल्या अधिका-याची चौकशी सुरू आहे.
या सीसीटिव्हीत दिसत असलेला अधिकारी विजय मोतलिंग व्याजाने लोकांना पैसे देतो त्यानंतर ते पैसे लोकांनी परत केल्यानंतरही त्यांना धमकावून खोट्या केसमध्ये टाकण्याची धमकी देत अधिक पैसे उकळतो आहे. असे अनेक लोकांची फसवणूक केलीय. स्वता पोलिस अधिकारी असून देखील सावकारी करतायेत. यांच्याकडे ऐवडे पैसे कुठून आले असा प्रश्न उपस्थित झालाय.
सिसिटीव्ही कॅमेरात दिसणारे शाहिद खान. 7 फेब्रुवारीला शाहीद आपल्या घरात काम करत असताना साडे आठच्या सुमारास एक पोलीस अधिकारी घरात घुसतो आणि थेट शाहिद यांना मारहाण करण्यास सुरुवात करतो. सिसिटीव्ही मध्ये तुम्ही अगदी स्पष्ट पणे बघू शकता की कश्या प्रकारे वर्दीतील अधिकारी मारहाण करतोय
सांगीतल जातंय की शाहिद यांच्या आईने 2016 साली सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या विजय मोतलिंग यांच्याकडून साडेतीन लाख रुपये कर्ज घेतले होते. मात्र काही अवधीतच हे कर्ज व्याजासह फेडून देखील विजय मोतलिंग हे या ना त्या कारणाने त्रास देत होते. शेवटी शाहिद यांनी आपल्याच घरात सिसिटीव्ही कॅमेरा लावला ज्यात या अधिकार्याचा कारनामा कैद झाल्याच शाहिद म्हणालेत
दरम्यान या मारहाणीची तक्रार शाहीद यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यासह थेट मुंबई पोलीस आयुक्तांपर्यत केली आहे. दोन्ही पक्षांनी एक मेकांन विरोधात आरोप केले असून सहाय्यक पोलीस आयुक्त या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.