नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची ८ महिन्यांनतर आज (२४ मार्च) सुटका करण्यात आली आहे. ओमर अब्दुल्ला यांना कलम ३७० च्या अंतर्गत ताब्यात घेण्यात आले होते. ऑगस्टपासून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. या आधी ओमर अब्दुल्ला यांचे वडील फारुख अब्दुल्ला यांना सोडण्यात आले होते.
Ex-CM Omar Abdullah released from detention after nearly 8 months following revocation of Public Safety Act (PSA) charges: Officials
— Press Trust of India (@PTI_News) March 24, 2020
जम्मू-काश्मीरमधील माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारूक अब्दुल्ला यांची नजरकैदेतून सुटका करण्यात निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. गेल्या ६ महिन्यांपासून फारूक अब्दुला हे नजरकैदेत होते. जम्मू-काश्मीरमध्ये ५ ऑगस्टला कलम ३७० हटविण्यात आले. यानंतर फारूक अब्दुल्ला यांना १५ सप्टेंबरपासून नजरकैदेत ठेवण्यात आले होते. फारूक अब्दुल्ला यांना जम्मू आणि काश्मीर पब्लिक सेफ्टी कायदा १९७८ (पीएसए) अंतर्गत नजरकैदेत ठेवण्यात आले होते. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, फारुक अब्दुल्ला आणि महेबूबा मुफ्ती या तिघांची नजरकैदेतून सुटका करा, अशी मागणी करण्यात आली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.