HW News Marathi
देश / विदेश

सरकार आर्थिक तूट भरुन काढण्यासाठी पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढ करणार ?

मुंबई | जगभरात कोरोनाचा प्रार्दुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे कच्चा तेलाच्या किमती ३० डॉलर प्रति बॅरलच्या आसपास कायम राहिली आणि सरकारने एक्साईज ड्यूटीत कोणतीही वाढ न केल्यास पेट्रोल डिझेलच्या किमती जवळपास १० ते १२ रुपये प्रति लिटर कमी होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, केंद्र सरकारने आर्थिक तूट भरून काढण्यासाठी एक्साईज ड्यूटी वाढवल्याने इंधन दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पेट्रोलच्या एक्साईज ड्यूटीत प्रति लिटर १७ रुपयांची, तर डिझेलवरील एक्साईज ड्यूटीत १२ रुपयांची वाढ करण्यात आली आहे . मोदी सरकारने मार्च महिन्यात दुसऱ्यांदा इंधनाच्या एक्साईज ड्यूटीत वाढ केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमत वाढल्याने याचा भार सर्व सामान्यांच्या यांचा फटका बसणार आहे.

दरम्यान, कोरोनामुळे देशाची अर्थव्यस्था कोलमडली असल्यामुळे ही आर्थिक तूट भरुन काढण्यासाठी सरकारने एक्साईज ड्यूटी ही वाढ केल्याचे शक्यता व्यक्त केली जाते. यापूर्वी केंद्र सरकारने १४ मार्च रोजी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर ३ रुपयांच्या एक्साईज ड्यूटी वाढवली होती. त्यामुळे सरकारला २,००० कोटीहून अधिकचा फायदा होईल, असा अंदाज वर्तवला गेला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोक्सो कायद्याअंतर्गत येणाऱ्या दोषींनी दयेचा अर्ज करता येऊ नये !

News Desk

गुलाम नबी आझाद यांचं कौतुक करताना पंतप्रधान झाले भावूक 

News Desk

अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख पुन्हा पुढे ढकलली

News Desk