HW News Marathi
मुंबई

उद्या सकाळी ५ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू असणार, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (२२ मार्च) करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूत वाढ करत ती उद्या (२३ मार्च) सकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. तसेच, कोरोनाग्रस्तांची काळजी घेणारे, कोरोनाशी रात्रंदिवस लढणारे, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी या सगळ्यांसाठी संपूर्ण देशभरातून सामान्य नागरिक, राजकीय नेते, कलाकार मंडळी सगळ्यांनीच टाळ्या वाजवून कौतूक करत त्यांना प्रोत्साहन दिले.

जनता कर्फ्यूला प्रतिसाद देणाऱ्या महाराष्ट्रवासियांचे आभार व्यक्त करता, जनता कर्फ्यू उद्या पहाटे पाच वाजेपर्यंत वाढ करण्याचा निर्णयही आरोग्यमंत्री टोपे यांनी जाहीर केला. तसेच, राज्याच्या सीमाही बंद करण्याच्या विचारात सरकार असल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, अत्यावश्यक सेवा या सुरु राहणार आहेत, लोकांनी भाजीपाला, किंवा अन्नधान्य याचा साठा करुन ठेवू नका असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. सर्व जनतेने पंतप्रधानांच्या या आवाहानाला चांगला प्रतिसाद दिला असाच प्रतिसाद हा कोरोनाग्रस्तांना द्या जेणेकरुन त्यांच्या तब्येतीत सुधारणा होईल आणि त्यांचे मनोबल वाढेल.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Independence Day | स्वातंत्र दिनानिमित्त मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंना तिरंग्याची रोषणाई

News Desk

भायखळा परिसरातील स्टेशनरी दुकानात आग

swarit

नवी मुंबईत कुत्रे होतायत निळे!

News Desk