HW News Marathi
देश / विदेश

एकीकडे कोरोनाचे सावट, तर दुसरीकडे देशभरात पावसाची शक्यता

मुंबई | कोरोनाचा विषाणू उन्हात तासा-दोन तासांत मरुन जातात अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. परंतु आता राज्यात एकीकडे उन्हाळा सुरु होत असतानाच येत्या २४ ते ४८ तासांत देशातील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात विदर्भ, दक्षिण पूर्व आणि पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पावसाची शक्यता आहे. हवान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार २३ मार्चला संध्याकाळपर्यंत हवामानात अनेक बदल होतील. तसेच येत्या ४८ तासांत अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भात पावसाची तीव्रता अधिक असेल असा अंदाजही वर्तवण्यात आला होता. दरम्यान, १९ आणि २० मार्चला उशिरा पश्चिम महाराष्ट्रात हलक्या तर विदर्भातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीटही झाली होती. येत्या एका आठवड्यात मध्य भारतातील विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावेळी मध्य भारतातील पश्चिम भागात परिणाम होईल. २४ मार्चला विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांत हलक्या सरी तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याची माहिती आहे.

संपुर्ण देशात कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढत असतानाच राज्याच्या काही भागांवर पुढील ४८ तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यातील जिल्हे, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, महाबळेश्वर, खान्देशमधील जळगाव जिल्ह्यातही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी जालना, बुलढाणा, औरंगाबाद या ठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसानही झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांच्या वाढदिवसासाठी राष्ट्रवादीकडून खास भेट, सुप्रिया सुळेंची घोषणा

News Desk

एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादेत मोठी कपात

Gauri Tilekar

ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या सुरक्षेत वाढ, पुरोगामी विचारवंतांच्या सुरक्षेत केली वाढ

News Desk