HW News Marathi
देश / विदेश

राष्ट्रपती रामनाथ कोविंदही करणार कोरोनाची चाचणी

नवी दिल्ली | देशभरात सामान्य व्यक्तींसोबतच अभिनेते, गायक यांनाही कोरोनाची लागण होत आहे. काल (२० मार्च) बॉलिवूडची गायिका कनिका कपूर ही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. तिने ज्या पार्टीचे आयोजन केले होते त्यात अनेक राजकीय मंडळी उपस्थित होते त्यांपैकी दुष्यतं सिंह हे होते. दुष्यंत सिंह त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटले होते. त्यामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपली कोरोना तपासणी करणार आहेत. आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांनी हा निर्णय भाजप खासदार दुष्यंत सिंह यांच्या भेटीनंतर घेतला आहे. राष्ट्रपती भवनातर्फे जारी करण्यात आलेल्या एका पत्रकात ‘कोरोनाबाबत सरकारने जारी केलेल्या सर्व सुचनांचे पालन राष्ट्रपतीदेखील करणार आहेत,’ अशी माहितीही देण्यात आली आहे.

राष्ट्रपतींनी सरकारच्या पुढील आदेशापर्यंत आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. यादरम्यान, दुष्यंत सिंह यांच्यासोबत कोणत्या ना कोणत्या कारणाने संपर्कात आलेले लोकही स्वतःला क्वारंटाइन करत आहेत. दरम्यान, भाजपचे खासदार दुष्यंत सिंह आपली आई आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांच्यासह रविवारी १५ मार्चला लखनऊमध्ये कनिका कपूरच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. अशातच कनिका कपूरला कोरोनाची झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कनिका ज्या लोकांना भेटली होती, किंवा ज्यांच्या संपर्कात होती, त्यांची चौकशी करून तपासणी सुरू आहे.

दरम्यान, कनिका कपूरविरोधात संवेदनशील माहिती लपवून ठेवल्याप्रकरणी कारवाई करण्यात येणार आहे. कनिकाने ज्या ठिकाणी ही पार्टी ठेवली होती. त्या ताज हॉटेलला बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही वैद्यकिय चाचणी करण्यात येणार आहे.

कनिका कपूर कोरोना पॉझिटिव्ह

कनिका १५ मार्चला लंडनहून लखनऊ विमानतळावर आली होती. विमानतळावर तिचे थर्मल स्क्रिनींग झाले होते. मात्र, तेव्हा मला कोरोना झाल्याची लक्षणे नव्हती असेही तिने सोशल मीडियाद्वारे सांगितले. मात्र, कनिकावर विमानतळावरुन पळून गेल्याचा आरोप केला आहे. एका वाहिनीच्या वृत्तानुसार कनिका कपूर ही विमानतळावरील ग्राऊंड स्टाफच्या मदतीने बाथरुममध्ये लपून राहिली होती आणि त्यानंतर तिने तेथून पळ काढला.

कनिकाने १५ मार्चला लखनऊमधील शालिमार गॅलंट अपार्टमेंटमध्ये एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये अनेक अधिकारी आणि नेत्यांनी हजेरी लावली होती. या पार्टीमध्ये एकूण १२५ जण सहभागी झाले होते आणि त्यामूळे पार्टीतील सगळेच जण जेव्हा कनिका कोरोना पॉझिटिव्ह आहे हे समजल्यावर दहशतीखाली आली आहे. या पार्टीशिवाय कनिकाने लखनऊच्या ताज हॉटेलमध्येही मुक्काम केल्याचे समोर आले आहे. ही माहिती कळताच त्या बिल्डींगमधील अनेकजणांनी आपलया तिथला मुक्काम हलवला आहे. तसेच, तिच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोंटाईन करण्यात आले आहे. तसचे, लखनऊच्या आरोग्य विभागाने जे लोक कनिकाच्या सानिध्यात होते त्या सगळ्यांना फोन करुन स्वत:ला कोरोंटाईन करायला सांगितले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

द्राविडी चळवळीचे प्रणेते पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना,डोक्यावर ठेवले चप्पल

News Desk

बलात्कार पीडितेचे मूत्र प्यायला सांगितल्याने आरोपीची आत्महत्या

News Desk

लोकलचा प्रवास सुखकारक, दरवाजांवर ‘सेफ्टी’ सेन्सर

News Desk