मुंबई | मध्य, हार्बर आणि पश्चिम या तिन्ही मार्गांवर आज (७ जुलै) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेच्या तांत्रिक कामांसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेमार्गावर माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्ग, हार्बर मार्गावर वडाळा ते मानखुर्दच्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवरील सांताक्रुझ ते माहीमदरम्यान अप धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mega Block on 7.7.2019
Matunga-Mulund Dn fast line from 10.30 am to 3.00 pm and Vadala Road-Mankhurd Up & Dn harbour lines from 11.10 am to 3.40 pm. pic.twitter.com/8h11jZpYTx— Central Railway (@Central_Railway) July 6, 2019
ब्लॉकदरम्यान हार्बरवरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉकच्या काळात मध्य रेल्वेच्या मुख्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल उशिराने धावणार आहेत. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड डाउन जलद मार्गावर सकाळी १०.३० ते दुपारी ३:00 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाउन दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
Western Railway: Today on 07.07.2019 due to technical problem at Santacruz, all up local is running 10-15 minutes late. Inconvenience caused to passengers is deeply regretted. #Mumbai pic.twitter.com/UbF68WvM0p
— ANI (@ANI) July 7, 2019
पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते माहीमदरम्यान अप धिम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सांताक्रुझ ते माहीमदरम्यान लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर वडाळा ते मानखुर्दच्या अप आणि डाउन दोन्ही मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. वाशी, बेलापूर, पनवेल, दरम्यानच्या दोन्ही मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल ते मानखुर्द दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.