HW News Marathi
मुंबई

स्विफ्ट कारमधील तिघांचा जळून मृत्यू.. घातपाताची शक्यता ?

पुणे- वडगाव आनंदमध्ये एका कारने पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात कारमधील तीन तरुणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. नगर-कल्याण महामार्गावरील आळेफाटाजवळ मंगळवारी रात्री दीडच्यासुमारास ही घटना घडली. गाडीतून प्रवास करणारे तिन्ही तरुण पुण्यावरून घरी परतत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. गाडीने पेट घेतल्यानंतर बाहेर येण्यास वेळ न मिळाल्यामुळे तिघांचाही होरपळून मृत्यू झाला आहे. मृत पावलेले तिघेही मेडिकल व्यावसायिक असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, नेमक्या कोणत्या कारणामुळे गाडीला आग लागली, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. आळेफाटा पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईकर कामात आगे, पगारात मागे

News Desk

चार रुपड्यासाठी इमान विकू नका: राज ठाकरेंचे प्रशासनाला खरमरीत पत्र

swarit

‘अंधेरीच्या राजा’चे आज विसर्जन

News Desk