HW News Marathi
मुंबई

पश्चिम रेल्वेवरील ए.सी लोकल सरकारच्या पुढील आदेशापर्यंत बंद राहणार

मुंबई |देशभरात सगळ्यात जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या ही महाराष्ट्रात आहे. मुंबईतही हा आकडा ८ असून २ जण व्हॅंटिलेटरवर आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबईत धावणारी एसी लोकल ही उद्यापासून बंद करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. दरम्यान, पुढील आदेश येईपर्यंत ही लोकल सेवा बंद राहणार आहे. तसेच ट्रान्स हार्बरवरील एसी लोकल देखील उद्यापासून ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. एसी लोकलमधून प्रवास करताना कुणालाही कोरोनाची लागण होऊ नये, नागरिकांनी गर्दीतून प्रवास करणे टाळावे यासाठी ही सेवा बंद करण्यात येत असल्याचे रेल्वेच्या सुत्रांनी सांगितले आहे. एसी लोकल ही संपुर्ण बंद असते, त्यामुळे एखाद्याच्या शिंकण्यामुळे त्यातील जंतू हे बाहेर जाण्यास वाव नसतो. त्यामुळे कोणालाही त्याचा संसर्ग होऊ शकतो. शिवाय एसी लोकलचे तापमान अत्यंत कमी असल्याने संसर्ग होण्याची शक्यता ही सर्वाअधिक असते. त्यामुळे एसी लोकल बंद करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

एसी लोकल बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय जरी झाली तरी लोकांच्या हितासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गरज असल्यास लोकलही बंद करणार असे सांगतिले पण तो अगदी शेवटचा पर्याय असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत नमुद केले. दरम्यान, राज्यातील करोना रुग्णांचा आकडा ४९वर पोहोचला आहे. तर देशातील कोरोना रुग्णांची संख्या १७७ वर गेला आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नागरिकांशी संवाद साधत विशेष काळजी घेण्याचे आणि गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशावासियांशी संबोधित करणार आहे. त्याआधी ४ वाजता देशातील मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांशी ते व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशाला इव्हेंटची नव्हे तर रुग्णालये, व्हेंटीलेटरची गरज आहे

News Desk

गोपीनाथ मुंडेंचा वाढदिवस 12 डिसेंबरला नाही – अजित पवारांचा गौप्यस्फोट

News Desk

मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर एसी डकमध्ये लागली आग

swarit