HW News Marathi
व्हिडीओ

Vari Festival | ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’रिंगण सोहळा…

पायघड्या धोतराच्या झाल्या गजर हरी नामाचा… ‘ज्ञानदेव माऊली तुकाराम’चा जयघोष आणि टाळ मृदंगाचा गजर अशा वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे रिंगण काटेवाडीत पार पडले. रिगणं पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले अश्व रिंगण बेलवाडी (ता. इंदापूर) येथे गुरूवारी (4 जुलै) मोठ्या उत्साहात पार पडले.पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांसह परिसरातील ग्रामस्थांनी हजेरी लावली होती. रिंगण सोहळ्याने भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. सकाळी सात वाजल्यापासूनच रिंगणस्थळावर भाविकांनी गर्दी केली होती. टाळकरी, विणेकरी, तुळसी वृंदावन धारक महिला, झेंडेकऱ्यांचे रिंगण पार पडले. विठू नामाच्या गजरात रिंगणासाठी धावताना आबाल-वृध्दांचे भान हरपले. वारकरी भाविकांनी रिंगण सोहळ्या दरम्यान अलिखित शिस्तबद्ध नियमांचे दर्शन घडवले. हरीनामाचा गजर करीत असतांनाच वारकऱ्यांनी सेल्फी काढण्याचाही आनंद घेतला. #VariFestival #Pandharpur #Vari2019 #AashadhiEkadashi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“येत्या आठवड्याभरात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल”; Sanjay Gaikwad

News Desk

Disha Salian ला Sachin Vaze च्या गाडीतून नेण्यात आलं?, राणेंच्या दाव्यामुळे खळबळ |

News Desk

घोडेबाजार थांबवण्यासाठी सरपंचपदाची सोडत निवडणुकीनंतरच !हसन मुश्रीफ Exclusive

News Desk