HW News Marathi
महाराष्ट्र

राजू शेट्टींनी घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई । स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज (४ जुलै) दुसऱ्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण संघटेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राजू शेट्टींनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर जाऊन ही भेट घेतली. दोन नेत्यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधान आले आहे. या दोघांमध्ये जवळपास एक तासांहून अधिक चर्चा झाली आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हेदेखील उपस्थित होते.

यापूर्वी देखील शेट्टींनी ठाकरेंची भेट घेतली होती. त्यामुळे पुन्हा झालेल्या या भेटी मागे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवीन राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता वर्तविण्यात जात आहे. राज ठाकरेंसोबत विविध मुद्दयांवर चर्चा करण्यात आली भाजपविरोधी पक्षांचा पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंर्दभातच चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

आता मनसे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना महाआघाडीसोबत जातात की, नवीन वेगळी चूल मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासाठीच कदाचित राजू शेट्टींनी राज ठाकरेंच्या भेटीगाठी सुरू केल्या आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांची रणनीती आखण्यासाठीच या भेटी असल्याचे बोलले जात आहे. तेव्हा आगामी निवडणुकांत या दोन्ही नेत्यांकडून कुठली भूमिका घेतली जाते हे पाहणे महत्वाचे आहे.

लोकसभा निवडणुकांध्ये आपला एकही उमेदवार उभा न करताही मोदी सरकार आणि भाजपच्या विरोधात राज ठाकरे यांनी जोरदार प्रचार केला. मात्र राज ठाकरेंच्या प्रचाराता म्हणावा तसा फायदा झाला नाही. पण विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने राज ठाकरेंनी केलेला तो प्रचार फायद्याचा ठरु शकतो असेही बोलले जात आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना मोठा दिलासा, चौकशी तूर्तास बंद

News Desk

‘उद्धवजी, कायदा-सुव्यवस्था बिघडतेय, विशेष अधिवेशन बोलवा’ – भगतसिंग कोश्यारी

News Desk

Hw Exclusive |  चंद्रकांत पाटलांनी ‘या’ शब्दांत केली रश्मी वहिनींची स्तुती !

swarit