HW News Marathi
मुंबई

राहुल गांधी मुंबईमध्ये दाखल, शिवडी न्यायालयात हजर राहणार

मुंबई । काँग्रेस खासदार राहुल गांधी आज (४ जुलै) शिवडी न्यायालयात सुनावणीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. विमानतळाबाहेर काँग्रेस समर्थकांच्या घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. शिवडी न्यायालयात दाखल हजर राहणार आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणात राहुल यांनी आरएसएसच्या विचारसणनेविरोधात ट्वीट केल्याबद्दल आरएसएसच्या एका कार्यकर्त्याने राहुल यांच्या विरोधात बदनामीचा दावा ठोकला होता. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी राहुल मुंबई येणार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते व व्यवसायाने वकील असलेले धृतीमान जोशी यांनी राहुल गांधी, काँग्रेसच्या प्रमुख सोनिया गांधी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) (सीपीआय) (एम) आणि सीपीआय (एम)चे नेते सीताराम येचुरी यांच्याविरोधात माझगाव दंडाधिकाऱ्यांपुढे खासगी तक्रार केली. फेब्रुवारी महिन्यात दंडाधिका-यांनी राहुल गांधी व येचुरी यांना समन्स बजाविले. त्यानुसार, राहुल गांधी व येचुरी यांना आज दंडाधिका-यांपुढे उपस्थित राहणार आहेत.
“गौरी लंकेश यांच्या हत्येसंदर्भात राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्वीटरवर आरएसएसच्या विचारसरणीविरुद्ध बोलतात किंवा लिहितात, त्यांच्यावर दबाव आणला जातो, त्यांना मारले जाते किंवा त्यांची हत्या करण्यात येते. कारण गौरी लंकेश उजव्या विचारसरणीविरोधात सातत्याने लिहीत आल्या. असे ट्वीट केले होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेंच्या हस्ते नॅशनल मोबाईल मेडिकल युनिटचे लोकार्पण

Gauri Tilekar

बातमीचा इम्पॅक्ट | धारावीचा शेटवाडी नाला झाला साफ

swarit

शहीद कॉन्स्टेबल स्व. विलास शिंदे चौक

News Desk