HW News Marathi
मुंबई

बातमीचा इम्पॅक्ट | धारावीचा शेटवाडी नाला झाला साफ

मुंबई | मान्सून अवघ्या काही दिवसातच मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. परंतु महापालिकेकडून काही ठिकाणी अद्याप नाले सफाई झालेली नाही. पावसाला अचानक सुरुवात झाली तर धारावीचा शेटवाडी नाला पाण्याने तुडूंब भरले आणि जनजीवन विस्कळीत होईल अशी भिती शेटवाडी नाला परीसरात रहाणा-या लोकांना वाटत होती. या ठिकाणी रहाणा-या लोकांना दिलासा मिळावा पालिकेने हा नाला लवकरच स्वच्छ करावा यासाठी एच डब्लू मराठी न्यूज ने हि बातमी लावून धरली होती. बातमीची दखल घेत महापालिका जी उत्तर विभागाकडून या नाल्याची स्वच्छता करण्यात आली आहे.

स्थानिकांनी मानले एच डब्लू मराठी न्यूजचे आभार

मान्सून पूर्व नालेसफाईमुळे स्थानिकांना दिलासा मिळाला असून स्थानिकांनी एच डब्लू मराठी न्यूज चे आभार मानले आहेत. दरवर्षी सदर ठिकाणी वेळेत नालेसफाई होत नसल्यामुळे परिसरातील घरांमध्ये पावसाळ्यात पाणी तुंबून रोजच्या वापरातील वस्तूंचे नुकसान होते. तसेच पालिकेने वेळेत स्वच्छता न केल्यामुळे या ठिकाणी डासांचे प्रमाण अधिक आहे लोकांना घराच्या खिडक्या उघडता येत नाही. शौचालयाचे पाणी सोडण्यासाठी विषेश वाहिनीची व्यवस्था नसल्यामुळे अनेक ठिकाणी हे पाणी या नाल्यात सोडले जाते त्यामुळे स्थानिकांमध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

  • प्रदिप सोनावणे | स्थानिक रहिवासी- धारावी

गेल्या अनेक दिवसांपासून तुडूंब भरलेल्या या नाल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले होते. या ठिकाणी रहाताना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. अनेकदा पाठपुरावा करुनही महापालिका प्रशासन आमच्या समस्येची दखल घेत नव्हते परंतु एच डब्लू न्यूजने सामान्य लोकांची समस्या जाणून हा विषय लावून धरला. बातमीची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने हा नाला पावसाळ्यापुर्वी पुर्ण स्वच्छ केल्यामुळे आम्ही एच डब्लू न्यूजचे आभारी आहोत.

  • अमर शिंदे | स्थानिक रहिवासी- धारावी

अनेकदा मी स्वत: या नाल्यात उतरुण नाल्याची स्वच्छता केली आहे. बाजूला घर असल्यामुळे या नाल्यात पाणी भरल्यानंतर आम्हाला त्रास सहन करावा लागतो. माझ्या बालपणी रुंद असलेला नाला दिवसेंदिवस अरुंद होत आहे महापालिका आणि स्थानिक लोक प्रतिनिधींच्या हलगर्जीपणामुळे हा नाला कधीही पुर्णपणे साफ केला जात नाही त्यामुळे दुर्गंधी आणि डासांची समस्या या ठिकाणी नेहमीच असते. परंतु यंदा पावसाळ्यापुर्वी नालेसफाई झाल्यामुळे आम्ही आनंदी आहोत. एच डब्लू मराठी न्यूज ने सामान्य नागरीकांची हि समस्या लावून धरली त्याबद्दल आम्ही आभारी आहोत.

हेहि वाचा :

नालेसफाईकडे पालिकेचे दुर्लक्ष, धारावीतील शेटवाडी नाला गाळ कच-याने तुडुंब

Link : https://hwmarathi.in/mumbai/nalasefai-ignored-the-municipal-corporation-dharavis-shetwadi-drainage-tank/10499

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भांडारकर संस्थेत तोडफोड करणारे संभाजी ब्रिगेडचे ६८ जण निर्दोष

News Desk

मेस्मा कायद्यावरून शिवसेना पुन्हा आक्रमक पाचव्यांदा सभागृह तहकूब

News Desk

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २०२०चा ‘गुढीपाडवा मेळावा’ रद्द

swarit