HW News Marathi
महाराष्ट्र

#CoronaVirus : कोणत्याही शहराला ‘लॉकडाऊन’ करणार नाही !

मुंबई | राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्येत वाढ होत आहेत. राज्यात सध्या कोरोनाग्रस्तांचा आकडा ३९ वर गेला आहे. यामुळे पूर्णपणे शटडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही, आणि कोणत्याही शहराला लॉकडाऊन करणार नाही, ” अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी आज (१६ मार्च) पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. “राज्याच्या दृष्टीने पुढचे १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे असून कोरोना हे जागतिक संकट आहे,” असे मुख्यमंत्र्यांयांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री म्हणाले की, “ग्रामीण भागातल्या जत्रा असतील, धार्मिक यात्रा असतील, सभा समारंभ, लग्न किंबहुना राजकीय कार्यक्रमांना पायबंद घातला पाहिजे.” सर्व परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या आहेत, निवडणुका सुद्धा पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकारने निवडणूक आयोगाला विनंती केली आहे,” अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. तसेच राज्यातील सर्व परिक्षा पुढे ढकलल्याची माहिती त्यांनी माध्यमाद्वारे केली आहे.

“सर्व धार्मिक, स्थळांना गर्दी होऊ देऊ नका, असा संदेश मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे. ग्रामीण भागातील सर्व शाळा-महाविद्यालय बंद ठेवण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. लोकांनी अनावश्यक प्रवास करू नये, असे आवाहन मुखमंत्र्यांनी केले आहे. लोकांनी स्व:ताहून काळजी घ्या. पार्क, मॉल आणि बिच ठिकाणे जाणे टाळा, हॉटेल बंद ठेवण्यासंदर्भात अजून निर्णय घेतलेला नाही.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या निधीचा फायदा प्रत्यक्षात दुसरे पक्ष घेतात – गजानन कीर्तिकर

Aprna

 मेगाभरतीवरून चंद्रकांत पाटलांचा  यू-टर्न

swarit

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक सत्र सुरू

News Desk