HW News Marathi
महाराष्ट्र

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक सत्र सुरू

मुंबई: भीमा कोरेगाव येथील हिंसाचारा प्रकरणी पोलिसांनी सणसवाडी, भीमा कोरेगाव आणि कोंढापूरी या भागातून १२ जणांना अटक केली आहे. आरोपींमध्ये तीन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.

१ जानेवारी रोजी विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्याच्या कानाकोपºयातूून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. यादरम्यान, समाजकंटकांनी त्यांच्या वाहनांवर दगडफेक केली होती. या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले होते.

मंगळवारी पोलिसांनी १२ जणांना अटक केली असून यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडीदेखील सुनावली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ED अधिकाऱ्यांवरील गंभीर आरोपांवर मुंबई पोलिसांची एसआयटी! – गृहमंत्री

Aprna

2024 पर्यंत शिवसेना कुठेच ठेवणार नाही ,56 संपवायला कितीसा वेळ लागतो ? निलेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

News Desk

विरोधी पक्ष सोबत असल्यावरच मदत मिळत असेल तर तसं केंद्राने जाहीर करावं, राऊतांचा टोला

News Desk