HW News Marathi
महाराष्ट्र

शेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा मोठी घसरण, सेन्सेक्स १५२४ अंकांनी कोसळला

मुंबई | आठवड्याच्या सुरुवातील शेअर मार्केटमध्ये पडझड पाहायला मिळाली आहे. शेअर मार्केट आज (१६ मार्च) सुरू होताच सेन्सेक्स १५२४ अंकांनी कोसळला असून तो ३२,५५७ अंकावर स्थिरावला आहे. कोरोना व्हायरसमुळे शेअर मार्केट कोसळले आहे. यामुळे देशातील उद्योग- व्यवसायांना मोठा फटका बसला आहे.

गेल्या आठवड्यातही शेअर मार्केटमध्ये ऐतिहासिक घसरण झाली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी गेला शुक्रवार (१३ मार्च) ‘ब्लॅक फ्रायडे’ ठरला. मात्र, शेअर मार्टेकेटी घसरण पाहाता ४५ मिनिटांसाठी ठप्प होता. मात्र, बाजार बंद होताना सेन्सेक्स १,३२५.३४ अंकांनी वधारला असून, ३४१०३.४८ वर मार्केट बंद झाले. तर निफ्टी ४३३.५५ अंकांनी वाढून १००२३.७० वर बंद झाला होता.

दरम्यान, शेअर मार्केटच्या पडझडमुळे गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये चढउतार पाहायला मिळाला. यामुळे सोन्याची किंमत जवळपास ३००० रुपयांनी कमी झाली आहे. प्रति तोळा ४४ हजारांच्या वर असणारी सोन्याची किंमत प्रति तोळा ४१1 हजारांच्या घरात पोहोचली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एका नटीचा एक कायदा, बेटीचा देह मात्र विटंबना करुन जाळला – सामना

News Desk

‘मराठा’ विद्यार्थ्यांना न्याय मिळायलाच पाहिजे !

News Desk

“मराठा समाजाला आरक्षण द्या नाहीतर…”,चंद्रकांत पाटील यांचा सरकारला गंभीर इशारा  

News Desk