HW News Marathi
देश / विदेश

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला संशयित …..

सातारा | सातारा जिल्ह्यामध्ये अबुधाबी येथून आलेल्या एका ३० वर्षीय तरुणाला खोकला, ताप आणि छातीत दुखत असल्यामुळे शासकीय रुग्णालयामध्ये तातडीने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या संशयित रुग्णाचे नमुने घेण्यात आले असुन पुण्यात एन.आय.व्ही. या संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत, याबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. तथापि कोणीही घाबरून जावू नये, जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात अबुधाबी वरुन आलेला कोरोना संशयित रुग्ण दाखल झाला आहे. रविवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा रुग्ण दाखल झाला आहे. या संशयित तरुणाला खोकला,ताप छातीत दुखण्याचा त्रास होऊ लागल्याने जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं आहे.१३ मार्चला हा रूग्ण मुंबईमध्ये दाखल झाला आहे,त्यामुळे सध्या त्याचे रिपोर्ट्स आल्यानंतर पुढची माहिती मिळेलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर रॉबर्ट वाड्रा चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर

News Desk

निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते !

News Desk

इंधनाप्रमाणे आता सिलिंडरचे दरही प्रत्येक महिन्याला बदलणार

News Desk