HW News Marathi
Covid-19

कोरोनामुळे रविवार असुनही मंत्र्यांच्या बैठका ,शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई | कोरोना वायरसचा महाराष्ट्रातील प्रादुर्भाव लक्षात घेऊन अधिवेशन आटोपते घेण्यात आले.त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर या दोघांमध्ये ही महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. शरद पवार यांच्यासोबत अजित पवार, सुनिल तटकरे, जितेंद्र आव्हाड हेही या बैठकीला उपस्थित होते.

आजच्या बैठकीमध्ये सामाजिक न्यायविभागाचाही आढावा घेण्यात आला आहे.राज्यामध्ये सध्या कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे,या विषयावर या बैठकीमध्ये चर्चा झाली असल्याचे मंत्री जितेंद्र आव्हाडांनी सांगितले आहे.त्याचपद्धतीने औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिका निवडणुका पुढे ढकलण्याच्या संदर्भातही लवकरचं निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Corona World : जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या ४६ लाखांच्या वर, तर १७ लाखांहून अधिक कोरोना मुक्त

News Desk

राज्यात आज ६,५५५ नवे रुग्ण, १५१ जणांचा मृत्यू 

News Desk

आमचे पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील !

News Desk