मुंबई | “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे-पिंपरी चिंचवडमधील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकार घेतला असून शक्य असेल तर कर्मचाऱ्यांनी घरातून काम करा,” असा सल्ला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत निवेदन मांडले. राज्यातील विद्यार्थ्यांच्या परिक्षा उशिरा घेणे विचारधीन असेही ते यावेळी म्हणाले. पुण्यात कोरोनाचा आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. यामुळे आता पुण्यात १०, मुंबई ३, ठाणे १ आणि नागपूर ३ एकूण राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १७ वर केली आहे.
पुणे पिंपरी-चिंचवड १०वी आणि १२वी परीक्षा वगळाता शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी आज (१३ मार्च) विधानसभेत निवेदन दिले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाबाबत घेतलेले निर्णय आज मध्यरात्रीपासून लागू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. तसेच शक्य असेल तर कर्मचाऱ्यांनी घरातून काम करा, असे ते यावेळी म्हणाले. तर पुणे, मुंबई, गापूर, नवी मुंबईतील नाट्यगृह, व्यायामशाळा, स्विंगपूल आणि मॉल येथे जाणे टाळा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला दिल्या आहेत.
पुण्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह
पुण्यात कोरोनाचा आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. यामुळे आता पुण्यात कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संख्ये वाढ होऊन १० वर गेली आहे. अमेरिकेतून परतलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज माध्यमाशी बोलताना सांगितले. म्हैसेकरांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात १०, मुंबई ३, ठाणे १ आणि नागपूर ३ एकूण राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १७ वर केली आहे. तर पुण्यात ३११ संशयित असून त्यांना देखरेखीखालील ठेवण्यात आले आहे. यावेळी म्हैसेकर म्हणले की, सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरवू नका, आणि जे संशयित आहेत त्यांनी खराबाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी माध्यमातून लोकांना केले. देशात कोरोनाग्रस्ताची संख्या ७८वर झाली आहे.
देशातील करोनाग्रस्ताची अशी आहे संख्या
देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त राज्यांमध्ये केरळ आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यात १७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.उत्तर प्रदेश ११, दिल्ली ७ कर्नाटक ५ , पंजाब १, लडाख ३, राज्यस्थानमध्ये दोन परदेशी पर्यटक आणि १ भारतीय, तामिळनाडू १, तेलंगणा १ आणि हरियाणा १४ हे सर्व परदेशी पर्यटकांना कोरोनाची लागण झाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.