HW News Marathi
क्राइम महाराष्ट्र

बुलडाणा अर्बनच्या कोथळी शाखेत 1 कोटी 37 लक्ष रुपयांचा अपहार

मोताळा | आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी संस्था असलेल्या बुलडाणा अर्बन को ऑ केडीट सो. मार्या. बुलडाणा (Buldana Urban Co Op Credit Society Ltd) या पतसंस्थेच्या मोताळा तालुक्यातील ग्राम कोथळी शाखेत 1 कोटी 37 लक्ष 59 हजार रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस झाला. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी सचिन झंवर वय 40 वर्ष यांच्या फिर्यादीवरून तीन जणाविरोधात विविध कलमा 63/2023 च्या कलम 409, 420, 465, 468, 471, 34 भां. द.वीनुसार सोमवार (6 फेब्रुवारी) गुन्हा दाखल केला आहे. सदरच्या घटनेमुळे संपुर्ण मोताळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

 

या बाबत सचिन घनराजजी झंवर वय 40 वर्ष राहणार शास्त्री नगर मलकापूर यांनी बोराखेडी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे.  बुलडाणा संस्थेच्या कोथळी बुलडाणा अर्बन को ऑ केडीट सो. मार्या. शाखेत 21 जून 2021 पासून ते जुलै 2022 . शाखेतील व्यवस्थापक सुनिल मोहनलाल गांधी, लिपिक सतिष घनश्यामदास राठी व मधुकर दगळू सावळे यांनी संगणमताने पैशांचा गैरवापर केला. या तिघांनी शाखेतील नमुद ठेवीदारांच्या ठेवीचे पैसे बुलडाणा अर्बन को. ऑप. क्रे. सोसायटी कोथळीमध्ये जमा न करता खातेदारांच्या सेवीग पास बुकवर बनावट/ हस्तलिखीत नोंदी करून ते शाखेत जमा झाल्याचे खातेदारांना भासवून ते पैसे स्वता:साठी वापरले. या तिघांनी खातेदारांचे सेवीग खात्यांवरील पैसे त्यांच्या मुदत ठेव खात्यांवर वळते न करता शाखेतील इतर खात्यांवर वळवून तेथून विड्राल केलेत. या आरोपींनी एकूण 1,37,59,500 रुपयांचा अपहार वरील नमुद तिघांनी करून सदरचे पैसे स्वताचे फायदयासाठी वापरलेले आहेत.

 

या सचिन झंवर वय 40 वर्ष राहणार शास्त्री नगर मलकापूर यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी सुनील मोहनलाल गांधी वय 42 राहणार नांदुरा,सतिष घनशामदास राठी वय 40 राहणार मोताळा, मधुकर दगडु साळवे वय 52 राहणार मोताळा यांच्या विरुद्ध अप क्रमांक 63/2023 च्या कलम 409, 420, 465, 468, 471, 34 भांदवी नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांच्या मार्गदर्शनाखाली ए.पी.आय विकास पाटील करीत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलिसांमुळे महिला वकिलाचा आत्महत्येचा प्रयत्न फसला

News Desk

रेल्वेचे आरक्षणासाठी पोस्टपेड पर्याय

News Desk

फडणवीस कितीही प्रयत्न करा, बिघाडी काही होत नाही उलट आघाडी सरकार मजबूत होईल !

News Desk