HW News Marathi
देश / विदेश

राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा १४, आणखी २ जणांना कोरोनाची लागण

मुंबई । विधानभवनात आज (१२ मार्च) नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा १४ वर गेला आहे. राज्यात मुंबई आणि ठाण्यात असे आणखी २ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. मुंबईतील रुग्ण हा दुबईहून तर ठाण्यातील रुग्ण हा फ्रान्समधून आल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे, मुंबईतील रुग्ण हा सध्या हिंदुजा रुग्णालयात दाखल असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबईतील या रुग्णाचे वय जास्त असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते.

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव राज्याभरात वाढत चालला असून, पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी ३ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाच्या ५ संशयित रुग्णांचा नुकताच रिपोर्टआला असून त्यापैकी ३ रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या आता १४ वर पोहोचली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना विषाणूच्या ५ संशयित रुग्णांना वायसीएम रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आले होते. त्यांची तपासणी केली असता, ५ पैकी ३ जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. उर्वरित २ जणांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. या दोघांना घरी सोडण्यात आले आहे. तर लागण झालेल्या ३ रुग्णांना उपचारासाठी वायसीएममधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रकाश सिंह बादल यांचा पद्मविभूषण पुरस्कार परत करण्याचा निर्णय 

News Desk

वाजपेयींच्या निधनामुळे सात दिवस राजकीय दुखवटा

News Desk

अर्णब गोस्वामींना अटक म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला! अमित शाहांचा ठाकरे सरकार निशाणा

News Desk