HW News Marathi
देश / विदेश राजकारण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभीष्टचिंतन

मुंबई | राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु (President Draupadi Murmu) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन अभीष्टचिंतन केले. राष्ट्रपती मुर्मू यांनी आज (9 फेब्रुवारी) सकाळी मुख्यमंत्री शिंदे यांना दूरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या. सुदृढ, निरोगी, दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतानाच महाराष्ट्राचा सर्वसमावेशक, सर्वांगीण विकास साधण्यासाठी आजचा दिवस आपल्याला निश्चितच बळ देईल, असेही राष्ट्रपती मुर्मू यांनी नमूद केले. राष्ट्रपतींनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे आभार मानले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते.

 

ज्येष्ठ समाजसेवकअण्णा हजारे यांच्या दूरध्वनीवरून शुभेच्छा-आशीर्वाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण अण्णा हजारे यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा-आशीर्वाद दिले. हजारे यांनी शुभेच्छा देताना मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची जोडगोळी गतिमान राज्यकारभार करत आहे, अशी भावना व्यक्त केली.  अण्णा हजारे यांच्या सदिच्छा भेटीसाठी लवकरच राळेगणसिद्धी दौरा करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात पुन्हा स्थिर सरकार आणायचे असेल, तर देवेंद्र फडणवीसांना पुन्हा निवडून द्या !

News Desk

भीषण स्फोटात इमारत जमीनदोस्त, सात ठार

News Desk

मातृशोकानंतर नियोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदींची हजेरी

Aprna