HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपकडून डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी

मुंबई | भाजपने राज्यसभेची तिसरी उमेदवारांची घोषणा केली आहे. आता महाराष्ट्रातून भाजपने उदयनराजे भोसले, आरपीआयएचे अध्यक्ष रामदास आठवले आणि आता डॉ. भागवत कराड यांचे पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. भाजपकडून पक्षातील जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव चर्चेत आले होते. मात्र, आज (१२ मार्च) भाजपकडून राज्यसभेसाठी तिसऱ्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर सर्व चर्चांवर पूर्णविराम लागला आहे. आता भाजपकडून राज्यसभेचे सर्व उमेदवारांची घोषणा झाली आहे. राठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेची लॉटरी लागली आहे. भागवत कराड हे औरंगाबादचे माजी महापौर राहिले आहे.

महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या सात जागांसाठी येत्या २६ मार्च रोजी निवडणूक होत आहे. संख्याबळाच्या आधारावर भाजपकडून या निवडणुकीत तीन उमेदवार उतरवण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने भाजपमधील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उघडउघड नाराजी व्यक्त केली होती. मात्र, यानंतर पक्षाकडून खडसेंना केंद्रात बोलवून वेगळी जबाबदारी देण्याच विचार होत असल्याचे चर्चा रंगूल लागल्या होत्या. पुन्हा एकदा पक्षाकडून खडसेंचा पत्ता कट करत औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. आता येत्या काळा खडसे पक्ष सोड ना की पक्षात राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोलापूर-पंढरपूर महामार्गावर कार-एसटीमध्ये जोरदार धडक

News Desk

ओबीसी आरक्षणाचा तिढा कधी संपेल?, विजय वडेट्टीवार म्हणाले….

News Desk

“आमचं सरकार असतं तर ही वेळ आली नसती”,चंद्रशेखर बावनकुळेचं मोठं वक्तव्य

News Desk