HW News Marathi
देश / विदेश

काश्मीरच्या राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढविण्याच्या प्रस्तावास काँग्रेसचा विरोध

नवी दिल्ली | लोकसभेत शुक्रवारी (२८ जून) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवटीचा कालावधी ६ महिन्यांनी वाढविण्याचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र, काँग्रेसने अमित शहा यांच्या या प्रस्तावास विरोध दर्शविला आहे. काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी २ जुलैपासून जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढविण्याच्या अमित शहांच्या प्रस्तावाला विरोध केला आहे.

“कलम ३५६ अंतर्गत २० डिसेंबरपासून राष्ट्रपती राजवट लागू केली. २ जुलै रोजी या राजवटीचा सहा महिन्याचा कालावधी संपत आहे. यामुळे राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवावा”, असे सांगत अमित शहा यांनी लोकसभेत प्रस्ताव मांडला. तसेच, अमित शाह यांनी गेल्या ५ वर्षात राज्यात झालेले विकास कार्य आणि दहशतवादाविरुद्ध सरकारने केलेल्या कठोर कारवाईची माहिती देखील दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी बनू शकतात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा”

News Desk

पोलिसांची जागा घेणार कुत्रे

News Desk

आरबीआयकडून दिलासा, नाबार्ड, लघुउद्योग, नॅशन हाऊसिंग बँकांसाठी ५० हजार कोटींची मदती

News Desk