HW News Marathi
महाराष्ट्र

…आता मराठा बांधवांनीही मुस्लिमांच्या आरक्षणासाठी पाठिंबा द्यावा !

मुंबई | मुंबई उच्च न्यायालायने गुरुवारी (२७ जून) मराठा समाजाचे आरक्षण वैध ठरवत या समाजाला शिक्षणात १२ टक्के आणि नोकरी १३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मराठा आरक्षणानंतर आता मुस्लिम आरक्षणाची मागणी जोर धरत आहे. याच पार्श्वभूमीवर, “मराठा आरक्षणासाठी मुस्लिमांनी मराठा बांधवांना पाठिंबा दिला होता. आता मराठा बांधवांनीही मुस्लिमांच्या आरक्षणासाठी पाठिंबा द्यावा”, अशी मागणी एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.

“मराठा समाज जेव्हा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत होता तेव्हा आम्ही त्यांना पूर्ण समर्थन दिले होते. त्यामुळे आता मुस्लीम समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाजाने पाठिंबा द्यावा”, अशी मागणी जलील केली आहे. “मराठा समाजाच्या आंदोलनांदरम्यान अनेक मुस्लिम बांधवांनी स्टॉल लावून समर्थन दर्शविले होते. त्यामुळे आता राज्यातील किंवा लोकसभेतील मराठा समाजातील नेत्यांनी देखील मुस्लिमांच्या आरक्षणासाठी आम्हाला पाठिंबा द्यावा”, असे जलील यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘वेड्यावाकड्या घोषणा करणार नाही आणि केंद्राकडे वेडीवाकडी मागणीही करणार नाही’

News Desk

“केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात बळी गेलेल्यांपैकी मी एक” प्रताप सरनाईकांचं मोठं वक्तव्य!

News Desk

आमच्या मध्यस्थिमुळेच सेना – कंगनातील वाद निवळला, आठवलेंचा दावा

News Desk