HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेच्या गळतीच्या प्रमाणात वाढ

मुंबई | अंधेरी पश्चिमचे अविनाश बारस्कर हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. तसेच यवतमाळ जिल्यातील शिवसेनेच्या मोठ्या गटाने मनसेत प्रवेश केल्याची घटना घडली आहे. मनसेचे जिल्ह्यध्यक्ष देवा शिवरामवार यांच्या नेतृत्वाखाली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेऊन मनसेत जाहीर प्रवेश केला आहे.

https://twitter.com/MarathiTw/status/956488168039002114

पालिका निवडणुकीनंतर मनसेच्या इंजिनला ब्रेक लागला असे सर्वांना वाटत होते. यानंतर मनसेत गळतीचे प्रमाण वाढतना दिसत होते. पण, मनसे पुन्हा नव्या जोमाने उभी राहताना दिसत असून मनसेत जादू संपल्याचे लोकांना वाटत होते. शिवसेनेतील मोठ्या चेहरेंनी मनसेत जाहीर प्रवेश केल्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे यांचे पारडे जड झाल्याचे दिसून आले आहे.

आगामी काळात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार असून या पार्श्वभूमीवर मनसेत प्रवेश करणे ही मोठी राजकीय उलाढाल असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे शिवसेनेतून मनसेत अजून किती शिवसैंनिक प्रवेश करतील याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘अमर-अकबर-अँथनी’ कधीच गुण्यागोविंदाने एकत्र राहू नयेत असे भाजपला स्थापनेपासूनच वाटत आले – सत्यजीत तांबे

News Desk

ईडीने मालमत्ता जप्त करणे म्हणजे संजय राऊत यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न! – जयंत पाटील

Aprna

राज्यातील ३६ जिल्ह्यांच्या नव्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर

News Desk