HW News Marathi
राजकारण

राज ठाकरेंनी कार्टूनमधून उडवली शिवसेनेची खिल्ली

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत आगामी निवडणुकांमध्ये भाजपसोबत युती न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरात सर्व शिवसैनिकांमध्ये सध्या उत्साह संचारलेला आहे. मात्र शिवसेना-भाजपमधल्या या सत्तासंघर्षावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास व्यंगचित्रातून उपहासात्मक टीका केली आहे. आपल्या फेसबूक अकाऊंटवर राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्वबळावर लढण्याच्या घोषणेच्या निर्णयाची खिल्ली उडवणारं व्यंगचित्र टाकलं आहे, ज्याला सोशल मीडियावर भरभरुन प्रतिसाद दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडेवर उद्धव ठाकरे असल्याचं या व्यंगचित्रात दाखवण्यात आलं आहे. ‘महाराष्ट्र सरकार(मधील एक) सादर करीत आहे (किती अंकी माहित नाही) परत सांगतो, सोडून जाईन! प्रयोग १९२(बहुदा)’ असं या व्यंगचित्रात लिहिण्यात आलं आहे.
या व्यंगचित्रामध्ये उद्धव ठाकरे सोडू? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारतायत. त्यावर ‘अहो पण, आम्ही कुठे धरलंय तुम्हाला’ असं उत्तर फडणवीसांनी दिल्याचं या व्यंगचित्रात दाखवण्यात आलंय.
मुंबईत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २०१९ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याची घोषणा केली. या कार्यकारणीत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्यावरही चांगलंच तोंडसुख घेतलं. आपल्या व्यंगचित्रातून राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या सत्तेवर लाथ मारण्याच्या घोषणेला नाटकाची उपमा दिली आहे. या व्यंगचित्रात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोटावर बसून सत्ता सोडू का? अशी धमकी देताना दाखवले आहेत
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई युथ कॉंग्रेसने केले मोदींना लक्ष

News Desk

विधान परिषदेच्या निवडणूकीत चमत्कार कसा घडेल हे उभा महाराष्ट्र सोमवारी पाहिलच ना! – अजित पवार

Aprna

साध्वी प्रज्ञा यांचा भाजपमध्ये प्रवेश, भोपाळमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता

News Desk