HW News Marathi
मुंबई

पद्मावत सिनेमाला मनसेकडून पाठिंबा असल्याची अफवा

मुंबई | पद्मावत सिनेमाला संपूर्ण देशभरातून विरोध होत आहे. या सिनेमाला करणी सेना आणि राजपूत संघटनांनी या सिनेमावर बंदी घालण्यासाठी ठिकठिकाणी विरोध प्रदर्शन करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पद्मावत सिनेमाल पाठिंबा दिला असल्याचे वृत्तसमोर येत होते. पण, मनसेने या सिनेमा प्रदर्शित होण्याबाबत कोणतेही अधिकृत पत्रक काढले नाही.

पद्मावत सिनेमाला सेन्सॉर बोर्ड आणि सुप्रीम कोर्टने दिलासा दिलेला असताना ही करणी सेना त्याला विरोध करणे चुकीचे आहे, असे सांगत मनसेच्या सरचिटणीस व महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी ‘मुंबईसह महाराष्ट्रात ‘पद्मावत’प्रदर्शित होण्यासाठी आवश्कता भासल्यास मनसे सज्ज असेल असे मत त्यांनी व्यक्त केले होते.’

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावत सिनेमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संरक्षण अशा आशयाच्या बातम्या विविध माध्यमांमध्ये झळकल्या आहेत. या बातम्यांमध्ये छापून आलेली भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनाला संरक्षण इत्यादी भूमिका ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका नाही अशी माहिती अविनाश अभ्यंकर यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे सदाशिव पेठेत 8 दुचाकी गाड्या जाळल्या

News Desk

मोटरमनच्या ‘त्या’ कृत्याला रेल्वे प्रशासन जबाबदार

News Desk

थर्माकोल बंदीला तुर्तास स्थगिती

News Desk