HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानमध्ये अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राइक

इस्लामाबाद | दहशतवाद्यांचे नंदनवन ठरलेल्या पाकिस्तानला वारंवार इशारा देऊनही ते वठणीवर येत नसल्याने आज अमेरिकेने ड्रोनद्वारे पाकिस्तानातील दहशतवादी तळावर हल्ला केला. यामध्ये अनेकजण ठार झाल्याचे वृत्त आहे. यापूर्वीही अमेरिकेने अशाच प्रकारे हल्ले करून दहशतवादाचा बिमोड करण्याचा प्रयत्न केला होता.

परंतु तरीही पाकिस्तानच्या कुरापती कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याने आज अखेर अमेरिकेने आक्रमक पवित्रा घेतला. ड्रोनद्वारे त्यांनी दहशवतवादी तळावर बॉम्ब हल्ला केला. यात अनेक सराईत दहशतवादी ठार झाले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कारवाईचा इशारा दिला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असून या हल्ल्यात हक्कानी संघटनेचे काही दहशतवादी ठार झाल्याचे बोलले जात आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षण प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार 

News Desk

अदनानचा अपमान, भारतीय कुत्रे’ म्हणून हिणवले

News Desk

प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुखसह भूपेन हजारिका यांना ‘भारतरत्न’ने गौरविले

News Desk