HW News Marathi
मुंबई

‘कोरोना’चा फटका आयपीएलला बसणार?

नागपूर | देशभरात पसरलेय्या कोरोना व्हायरसचा फटका यंदाच्या आयपीएलला देखील बसणार असल्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एप्रिल महिन्यात सुरु होणारी इंडियन प्रीमियर लीग कोरोनाच्या भीतीमुळे पुढे ढकलण्याच्या संदर्भात विचार सुरु असून त्या संदर्भातील निर्णय लवकरच देण्यात येईल अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशी विमानातून येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी केली जात असून सर्व शासकीय रुग्णालयात कोरोनासंदर्भात वॉर्ड आणि डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना व्हायरस संदर्भात आशा वर्कर्सना 11 ते 13 मार्च दरम्यान ट्रेनिंग दिले जाणार आहे. तरी घाबरुन जाण्याची गरज नाही, मास्कची गरज नाही, त्यामुळं मास्कची साठवणूक करू नका, असे आवाहनही राजेश टोपेंनी केले आहे.

कोरोना व्हायरसबाबत अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. शाळा बंद करा, काही शासकीय कार्यालयात बायोमेट्रोक पद्धती बंद करण्यात आली आहे, हे चुकीचे आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे, स्वच्छता ठेवायला हवी, जर आपणच काळजी घेतली तर कोरोनाशी दोन हात नक्कीच करू शकू. एकीकडे आयपीएलचे वेळापत्रक आधीच जाहीर झाले असले, तरी जगभर कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्याने, आयपीएलचे वेळापत्रक पुढे जाऊ शकते. तसे संकेतच महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही काय सतरंज्या उचलायच्या का; कार्यकर्त्याचा अजित पवारांना सवाल

News Desk

रामनाथ मोतें, शेषराव बीजवार यांची शिक्षक परिषदेतून हकालपट्टी

News Desk

रेल्वेच्या निषेधार्थ उपोषण

News Desk