HW News Marathi
मुंबई

येस बॅंकेला एसबीआयचा मदतीचा हात !

मुंबई | आर्थिक निर्बंधात अडकलेल्या येस बँकेला तारण्यासाठी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार भारतीय स्टेट बँकेने पुढाकार घेतला आहे. ९ मार्च पर्यंत येस बँकेला तारण्याचा आरखडा जाहीर करू, असे स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी सांगितले. या संपूर्ण प्रक्रीयेत येस बँकेच्या खातेदारांना कोणताही त्रास होणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

भारतीय रिजर्व्ह बॅंकेने घातलेल्या निर्बंधानुसार ग्राहकांना ३ एप्रिलपर्यंत खात्यातुन ५० हजार इतकीच रक्कम काढता येणार आहे. दरम्यान, एटीएम मशीनमधुनही पैसे मिळत नसल्याकारणाने ग्राहकांना बॅंकेच्या बाहेरच लांबच लाबं रांग लावावी लागत आहे. तसेच, बॅंकेतून पैसे काढायचे असल्यास चेक असणे बंधनकारक आहे पण बॅंकेने याची पुर्वसूचना न दिल्याकारणाने ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

दरम्यान, बँकेतील ठेवी सुरक्षित असून यावर महिनाभरात तोडगा काढण्याची ग्वाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल (६ मार्च) दिली. रिझर्व्ह बँकेने येस बँकेतील हिस्सा विक्रीसंदर्भातील नियमावली जाहीर केली आहे. त्यानंतर स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी येस बँकेतील हिस्सा खरेदीबाबत माहिती दिली. ‘एसबीआय’ची कायदे समिती यावर अभ्यास करत आहे. ९ मार्चला याचा अंतिम आराखडा जाहीर करू. येस बँकेत ४९ टक्के हिस्साखरेदीसाठी एसबीआय २५०० कोटी खर्च करेल . त्याशिवाय जवळपास २३ गुंतवणूकदारांनी एसबीआयला संपर्क केला आहे, अशी माहिती रजनीश कुमार यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कल्याण-डोंबिवली पालिकेचे मुख्यालय अनिधकृत

News Desk

डॉक्टरावर कोयत्याने हल्ला

News Desk

रिक्षात झोपलेल्या सख्या बहिणीवर बलात्कार

News Desk