HW News Marathi
राजकारण

भाजपच्या राज्य कार्यकारिणीकडून एकनाथ खडसेंना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी

मुंबई | भाजपच्या राज्य कार्यकारिणीकडून आता भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना राज्यसभेवर पाठवण्याची आग्रही मागणी होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपकडून राज्यसभेवर वर्णी लागणाऱ्यांमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र, यातच आता एकनाथ खडसे यांचे नावही पुढे येताना दिसत आहे. एकनाथ खडसे हे अनेक मुद्द्यांवरून आपल्या पक्षावर प्रचंड नाराज असल्याचे चित्र गेल्या बऱ्याच दिवसांपासून पाहायला मिळाले आहे. ज्येष्ठ नेते असूनही वारंवार आपल्याला डावलले गेल्याबद्दलची तीव्र नाराजी एकनाथ खडसे यांनी वारंवार जाहीरपणे व्यक्त देखील केली आहे. मात्र, आता खडसेंची हीच नाराजी दूर करण्यासाठी पक्षाकडून त्यांची राज्यसभेत वर्णी लागण्याची शक्यता आहे.

भाजपच्या राज्य कार्यकारिणीकडून एकनाथ खडसेंना राज्यसभेवर पाठवण्यासाठी आग्रही मागणी होत असली तरीही केंद्रातील पक्ष नेतृत्त्व त्यास तयार आहे का ? हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. येत्या महिन्यात राज्यातील ७ राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे या ७ जागांसाठी २६ मार्चला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या जागांपैकी भाजपकडे ३ जागा येत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या ३ जागांपैकी २ जागांसाठी भाजपकडून रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, आता कार्यकारिणीच्या मागणीनंतर राज्यातील पक्षनेतृत्त्व एकनाथ खडसेंच्या देखील नावाचा विचार तिसऱ्या जागेसाठी करत असल्याची माहिती आहे.

राज्यसभेत एकूण १७ राज्यांतील ५५ सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल २०२० मध्ये संपत आहे. राज्यसभेतील महाराष्ट्राला एकूण ७ सदस्यांचा कार्यकाळ येत्या २ एप्रिल २०२० ला संपत आहे. दरम्यान, ज्या ७ सदस्यांचा कार्यकाळ आता संपणार आहे त्यांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजिद मेमन, काँग्रेस ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई, शिवसेना राजकुमार धूत, भाजपकडून केंद्रीय मंत्री रामदास आठवले, अमर साबळे, संजय काकडे हे नेते आहेत. यांपैकी शरद पवार आणि रामदास आठवले हे पुन्हा एकदा राज्यसभेवर दिसणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#MaharashtraElections2019 LIVE UPDATE | सेलिब्रिटींनीदेखील बजावला मतदानाचा हक्क

News Desk

मागास भागाच्या सर्वंकष विकासाचा अजेंडा राबविणार! – उपमुख्यमंत्री 

Aprna

आ. महेंद्र दळवींच्या नेतृत्वात रायगड जिल्ह्यातील पेण मधील शिवसैनिक शिंदे गटात सामील

News Desk