HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानसभेच्या उपसभापतीपदी निवड

मुंबई | शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानसभेच्या उपसभापतीपदी निवड झाला आहे. कारण काँग्रेसने उपसभापतीपदावरील दावा सोडला असून गोऱ्हेंची बिनविरोधी निवड झाली आहे. गोऱ्हे या पहिल्या महिला उपसभापती होण्याचा मान मिळाला आहे. पावसाळी अधिवेशन सुरू होऊन आठवडा झाला आहे. विधीमंडळात विरोधकांनी अनेक अंतरिम बजेट, कर्जमाफी आणि विरोधीपक्ष नेते पदावरून आठवडा चांगलाच गाजला होता. आता आठवड्याला म्हणजे आज (२४ जून) विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड होणार आहे. यात

काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे हे १७ जुलै २०१८पर्यंत विधान परिषदेचे उपसभापती होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त आहे. संख्याबळाच्या जोरावर काँग्रेसने या पदावर दावा केला होता. मात्र, राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्या जागी काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांचे नावे विरोधीपक्षनेतेपदासाठी निश्चित केले आहे. तसे पत्रेही काँग्रेस-राष्ट्रवादीने विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना लिहिले आहे. मात्र, उपसभापतीपदाचा दावा केल्यास विरोधीपक्षनेतेपद देणार नाही, असा पवित्रा युतीने घेतला. त्यामुळे काँग्रेसची कोंडी झाली. काँग्रेसने नाइलाजाने उपसभापतीपदावरचा दावा सोडला आणि शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांना उपसभापतीपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

विधानपरिषदेच्या उपसभापतींची आणि विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीची घोषणा एकाच दिवशी करण्यात येणार आहे. आज ही निवडणूक होणार आहे. दुपारपर्यंत उपसभापतीपदासाठी अर्ज भरता येणार आहेत. गोऱ्हे वगळता इतर कोणत्याही उमेदवाराचे नाव न आल्यास त्यांची या पदी बिनविरोध निवड होईल. नवीन उपसभापतींच्या नावची घोषणा आज (२४ जून) करण्यात येणार आहे. विधान परिषदेत सध्या राष्ट्रवादीचे १७, काँग्रेसचे १६, भाजपचे २३ , शिवसेनेचे १२, लोकभारती ,शेकाप, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षचा प्रत्येकी १ आमदार आहे तर, ६ अपक्ष आमदार आहेत.

.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपला पैसा जमा करण्याची कला अवगत, संजय राऊतांचा टोला

Aprna

शिवछत्रपतींना घडविण्यामध्ये जिजाऊंचाच हात, पुरंदरेंनी ते वेगळीकडे नेण्याचा प्रयत्न! – शरद पवार

Aprna

WWE मधील ‘द ग्रेट खली’ यांचा भाजपमध्ये प्रवेश

Aprna