HW News Marathi
महाराष्ट्र

WWE मधील ‘द ग्रेट खली’ यांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली | डब्ल्यूडब्ल्यूईसारख्या इंटरनॅशनल फाईटमधून ओळख मिळालेला द ग्रेट खली उर्फ ​दलिप सिंग राणा याने भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या आठवड्यामध्ये पंजाबी अभिनेत्री माही गिलने भाजपमध्ये प्रवेश केला होता. खलीने डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. खलीच्या प्रसिद्धचा भाजपला पंजाबच्या विधानसभेत मोठा फायदा होईल.  सध्या देशात पाच राज्याचे विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू आहे. आणि पंजाबमध्ये २० फेब्रुवारी ११७ विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुका होणार आहे. 

दरम्यान, खलीने यापूर्वी पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या प्रचारातही भाग घेतला होता. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर खली म्हणाले, “भाजपमध्ये प्रवेश केला याचा मला आनंदच होत आहे. मोदींनी देशासाठी केलेल्या कामामुळेच ते आपल्या देशासाठी योग्य पंतप्रधान असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे. देशाला प्रगती करण्याची धोरणे पाहून मी प्रवाभित झालो. त्यामुळे मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.” 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलीसांनी स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, शासन सदैव आपल्या पाठीशी

News Desk

तुमच्यासारखे पक्ष सोडून केंद्रीय मंत्री झालो नाही; नवाब मलिक यांची राणेंवर टीका!

News Desk

Rohit R R Patil Exclusive : आबांची पुण्याईही आमच्या पाठिशी राहणार !

News Desk