HW News Marathi
महाराष्ट्र

मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’चा माफीनामा

मुंबई। सब टीव्हीवर तारक मेहता का उलटा चष्मा ही छोट्या पडद्यावर प्रसिद्ध मालिकेतील नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागात ‘मुंबईची भाषा हिंदी’ आहे असे म्हटल्यामुळे वाद ओढावून घेतला. यानंतर मनसेने मालिकेविरोधात आक्रमण पवित्रा घेतला. यामुळे मालिकेच्या वतीने याप्रकरणी संदर्भात एक व्हिडिओ प्रसारित करत त्या संवदाचा स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे.

या मालिकेत ‘तारक मेहता’ची भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांच्याकरवी व्हिडीओ पोस्ट करत माफी मागितली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने सर्वांना सामावून घेतले आहे. या अर्थाने मुंबईची भाषा हिंदी हे वाक्य वापरण्यात आले होते. आम्ही प्रत्येक प्रांताचा-धर्माचा आणि भाषेचा सन्मान करतो. पण मालिकेत प्रसारित झालेल्या संवादामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर यासाठी आम्ही माफी मागतो,” या शब्दांत निर्मात्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

या प्रकरणी मनसेच्या संताप व्यक्त केल्यानंतर मालिकेतील बापूजीची भूमिका साकारणाऱ्या अमित भट यांनी माफी मागितल्याने या वादावर पडदा पडला आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागात या मालिकेतील जेठालालचे वडील बापूजी यांच्या तोंडी मुंबईची भाषा हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आला आहे. याबाबत मनसेने आवाज उठवल्यानंतर आता मालिकेच्या निर्मात्यांनी व्हिडीओ प्रसारित करत माफी मागितली आहे.

मुंबईतील भाषा हिंदी नसून मराठी | चंपक चाचा

या प्रकरणावर मालिकेतील कलाकार चंपक चाचांनी पत्र लिहित जाहीर माफी मागितली आहे. चंपक चाचांनी पत्रात म्हटले की, “मुंबईतील भाषा हिंदी नसून मराठी आहे. त्याचा मलाही अभिमान आहे. सदर झालेल्या चुकीबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो. त्याची माफीपण मागतो. तसेच यापुढे अशी चूक होणार नाही याची मी व्यक्तीश: दखल घेईन.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

९३च्या बॉम्ब स्फोटातील आरोपींकडून मलिकांनी कवडीमोल भावात घेतली जमीन, फडणवीसांचा दिवाळीनंतरचा धमाका

News Desk

‘शिवाजी पार्क’वरच दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आग्रही का?

Manasi Devkar

भोसरी प्रकरणात एकनाथ खडसेंना दिलासा, २५ जानेवारीपर्यंत सुनावणी तहकूब

News Desk