HW News Marathi
महाराष्ट्र

हिंगणघाट जळीतकांड : आरोपी विकी नगराळेला पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी

वर्धा | हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे यांना आज न्यायालयीन कोठडी संपली आहे. या प्रकरणातील आरोपीविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसलळी आहे. या पार्श्वभूमीवर आज (८ फेब्रुवारी) सकाळी ६ वाजता पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने गुप्तता पाळत आरोपीला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत त्याची वर्धा कारागृहात रवानगी केली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी पुढे तापासाठी गरज भासल्यास पोलीस कोठडीचा अधिकार राखून न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. यापूर्वी आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. पोलिसांनी त्याच्याकडून घटनेवेळी वापरलेले सर्व साहित्य जप्त केले आहे. घटनेच्या वेळी त्याने घातलेले आणि नंतर लपवलेले कपडे आणि बूट तसेच पेट्रोलची बाटली आणि इतर साहित्याचा यात समावेश आहे.

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाबद्दल माहिती

नेहमीप्रमाणे शिक्षिका कॉलेजमध्ये शिकवायला पीडित तरुणी हिंगणघाट शहरात सोमवारी (३ फेब्रुवारी) सकाळी नंदोरी चौकवरून जात होती. यावेळी आरोपी विक्की नगराळे तिचा तिचा पाठलाग करत होता. आरोपीने पीडितेवर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती 20 ते 30 टक्के भाजली. पीडित तरुणीवर नागपूरच्या ऑरेज रुग्णालयात उपचार सरू असून पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे. पीडितेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. आरोपी हा शिक्षिका राहत असलेल्या दारोडा गावातीलच आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मख्यमंत्री साम, दाम, दंड, भेद वापरून आमचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करतायत !

News Desk

बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट बनवत पैशांची केली मागणी

News Desk

अजित पवारांच्या आदेशाने कारवाई झाली असेल तर पुरावे द्या, तुमच्या वतीने त्यांची तक्रार करेन!

News Desk