HW News Marathi
महाराष्ट्र

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे यांची निवड ?

मुंबई | विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. कॉंग्रेसला विधानसभेचे विरोधीपक्ष नेतेपद दिल्याने आता भाजप – शिवसेनेसाठी विधानपरिषदेचे उपसभापती सोडण्याची शिवसेना-भाजपची अट अखेर काँग्रेसकडून मान्य करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे, आता विधानपरिषदेच्या उपसभापतिपदासाठी शिवसेना-भाजपकडून जवळपास नीलम गोऱ्हे यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे.

काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांचा उपसभापती पदाचा कार्यकाळ १७ जुलै २०१८ रोजीच संपला आहे. त्यानंतर अद्यापपर्यंत या पदावर कोणाचीही निवड झालेली नाही. प्रथम काँग्रेस या उपसभापती पदासाठी आग्रही होती. मात्र, राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि विजय वडेट्टीवार यांना गटनेतेपद देण्यात आले. त्यानंतर, काँग्रेस व राष्ट्रवादीकडून वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेते पद देण्याची मागणी करण्यात आली.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलेल्या विरोधी पक्षनेते पदाच्या मागणीनंतर शिवसेना-भाजपकडून विधानपरिषदेच्या उपसभापती पदाबद्दल अट घालण्यात आली. “जर काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधी पक्षनेते पद हवे असेल तर त्यांनी उपसभापतीपद सोडावे”, अशी मागणी भाजप -शिवसेनेकडून करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लम्पीबाधित पशुधनापैकी एकूण २९ हजार ४१० पशुधन उपचाराने झाले बरे

Aprna

“मी कधीच माघार घेत नाही”, जितेंद्र आव्हाडांची ठाम भूमिका

Aprna

महागाईचा भडका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 3 रुपये 50 पैशांची वाढ

Aprna