HW News Marathi
महाराष्ट्र

ठाकरे सरकारच्या शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर

मुंबई | ठाकरे सरकारचे शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आज (२९ फेब्रुवारी) जाहीर करण्यात आली आहे. या यादीत कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरलेल्या नगर जिल्ह्यातील २ लाख ५२ हजार ४८३ शेतकऱ्यांची यादी कर्जमाफीच्या पोर्टलवर केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी दिली आहे. तसेच दुसऱ्या यादीत वर्धा जिल्ह्यातील ४६ हजार ४२४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. वर्धा जिल्हा प्रशासनाकडून आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत वर्ध्यातील दोन गावांतील १६६ शेतकऱ्यांचा समावेश होता. यापैकी १५४ शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ करणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान कर्जमाफी २०१९ योजनेची दुसरी यादी जाहीर केली आहे. कर्जमाफीच्या पहिल्या यादीनुसार एकूण १५ हजार ३५८ शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून हे सर्व शेतकरी ६८ गावातील लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली आहेत. तसेच एप्रिल महिन्याअखेर या योजनेच्या अंमलबजावणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

शेतकरी कर्जमाफीसाठी २५ हजार कोटींची तरतुद

ठाकरे सरकारकडून कर्जमाफीसाठी एकूण २५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विधानसभेत आज २४ हजार ७२३ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. या पुरवणी मागण्यांमध्ये महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेसाठी १५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागील आठवड्यात आकस्मिक निधीतून १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. अशाप्रकारे एकूण २५ हजार कोटी रुपयांची तरतूद कर्जमाफीसाठी करण्यात आली. त्यावर आता २७ फेब्रुवारी आणि २ मार्च रोजी यावर चर्चा होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महिला सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध, प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस स्थानक उभारणार !

swarit

भास्कर जाधवांनी पंतप्रधानांची नक्कल केल्यानंतर बिनशर्त मागितली माफी; जाणून घ्या नेमके घडले?

Aprna

आता सांगली आणि कोल्हापूरला देखील महापुराचा धोका….!

News Desk