HW News Marathi
महाराष्ट्र

इंदुरीकर महाराजांबाबत प्रसिद्धी मिळावी म्हणून बोलू नये,चाकणकरांचा तृप्ती देसाईंना टोला..

विजय शिंदे,इंदापूर | आज इंदापूर येथे भुमाता बिग्रेड च्या प्रमुख तृप्ती देसाई यांच्या झालेल्या पत्रकार परिषदेला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आमचे प्रतिनिधी विजय शिंदे याच्याशी संवाद साधला.

इंदापूर येथे बोलताना देसाई यांनी रुपाली चाकणकर या बोलबच्चन करणाऱ्या प्रदेशशाध्यक्ष आहेत ,आम्ही महिलांच्या साठी काम करत असताना त्या कधी आंदोलनात आल्या नाहीत असा आरोप केला होता. यावर बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या , आम्ही महिलांच्या प्रश्नावर काम करत असताना प्रसिद्धी साठी काम करीत नाही,गेली तेरा वर्ष राजकीय सामाजिक जीवनात काम केल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मला महिलांच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली.त्यामुळे माझ्यावर बोलण्याचा अधिकार देसाई यांना नाही.

ज्यांना स्वतः चा बेस नाही त्यांना स्वतः ची विधाने नीट मांडता येत नाहीत त्या मुळे त्यांनी बोलू नये.

निवृत्ती महाराज देशमुख यांचे सामाजिक काम मोठे आहे,महाराजांनी माफी मागितली असून तो विषय संपला आहे,त्या वर प्रसिद्धी मिळावी म्हणून बोलू नये असे मत चाकणकर यांनी व्यक्त केले.

निवृत्ती महाराज यांच्या चुकीच्या विधानांना आम्ही महिला म्हणून अनेक वेळा विरोध केला आहे परंतु विषय किती ताणायचा याला पण मर्यादा असाव्यात असे मत चाकणकर यांनी व्यक्त केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मोहनदादा, आधी पुणेकरांसाठी घराबाहेर तर पडा’, महापौर मुलीधर मोहोळ यांचा सल्ला!

News Desk

मुख्यमंत्री मराठा आरक्षणाविरोधात, त्यांना आज मनापासून आनंद झाला असेल, नारायण राणेंचे प्रहार

News Desk

हिजाबवरुन झालेली घटना दुर्दैवी; धार्मिक तेढ निर्माण होणार नाही यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावे – अजित पवार

News Desk